"देहाकडून - देवाकडे" जाताना मध्ये देश लागतो, समाज लागतो आणि जीवन जगत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. या विचारांनी प्रेरित होऊन गुजराती शिक्षण संस्थेची 1938 मध्ये स्थापना झाली आणि आजतागायत गुजराती हायस्कूल, गुजराती प्राथमिक शाळा, भानुमती वर्मा बालक मंदिर, गुजराती इंग्लिश मीडियम स्कूल अशा बहारदार वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. मला या गोष्टीचा अतिशय अभिमान आहे,की मी या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे.
लहानपणापासून मी या संस्थेचा उत्कर्ष होताना पहात आलो. यामध्ये समाजातील अनेक पदाधिकारी, मान्यवर, शाळेतील कर्मचारी या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे.ज्या संस्थेच्या उत्कर्षात माझ्या वडिलांचा हातभार लागला त्याच संस्थेत मला कार्य करण्याची संधी भेटते याचे मला मनस्वी समाधान आहे. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी देशातच नाहीतर विदेशातही शाळेचे नाव उंचावत आहेत. अनेक उच्च पदावर विराजमान आहेत.
प्रत्येक क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे आहे. "शाळेतील प्रत्येक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकलाच पाहिजे" असे मला वाटते. चांगल्या विद्यार्थ्यांना अजून हुशार करता येते परंतु जे अप्रगत आहेत, शैक्षणिक दृष्ट्या मागे आहेत त्यांना मूळ प्रवाहात आणणे अतिशय महत्त्वाचे आहे.
लवकरच खास पालकांच्या मागणीवरून गुजराती शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण देणाऱ्या विविध शाखा देखील सुरू करण्याचा गुजराती शिक्षण संस्थेचा मानस आहे. गुजराती शिक्षण संस्थेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील यात शंकाच नाही. यामध्ये शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. चला आपण सर्व मिळून या संस्थेच्या विकासाचा विचार करू.
|| शिक्षणाचा अमृत कलश
घेतला आम्ही हाती,
सदैव होत राहो
गुजराती शिक्षण संस्थेची प्रगती ||
Lorem ipsum dolor sit ametconse ctetur adipisicing elitvolup tatem error sit qui.